Birthday Wishes in Marathi  

 वाढदिवसाच्या मराठमोळी शुभेच्छा 

वाढदिवसाच्या मराठमोळी शुभेच्छा


वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. म्हणून आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या मराठमोळ्या भाषे मध्ये घेऊन आलो आहोत.


●आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂


●ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा🎂🎂🎂


●सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.


●नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂


●माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा 🎂🎂


●तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना ! 🎂🎂


●उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, 
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎂