Happy Diwali Wishes in Marathi



दिवाळीच्‍या शुभेच्छा

दिवाळीच्या शुभेच्छा


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा...!


धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!




लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,

होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्याकुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!


पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!


जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!


पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!


आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात यापण त्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा…
दिवाळीच्या शुभेच्छा...!


स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!


दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट,
उटणी, अत्तराचा घमघमाट..
लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेआठ,
आकाश दिव्यांची झगमगाट…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!


उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास, फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली...!


लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…!


सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली…!


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!


एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा...
"तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...!


दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!





स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!